आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात ११ वाजून ५५ मिनिटाला भूकंपाचा(Earthquake In Dahanu And Talasari) पहिला धक्का जाणवला आणि त्यानंतर पुन्हा चार मिनिटांनी म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला.

    पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा (Earthquake In Palghar)धक्का बसल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात ११ वाजून ५५ मिनिटाला भूकंपाचा पहिला धक्का जाणवला आणि त्यानंतर पुन्हा चार मिनिटांनी म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. ३.७ अशी तीव्रता रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील घरांच्या भीतींना तडे गेले आहे. सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानीचे वृत्त नाही.
    गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे सत्र थांबल्याचे जाणवत होते. मात्र, आज पुन्हा हादरे बसण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून जिह्यातील तलासरी, डहाणू, कासा ,चारोटी, कवाडा या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत आहे.

    याबाबत भूगर्भीय अभ्यास होत असून शासनाने या भागातील शासकीय कार्यालय, इमारती, आश्रमशाळा तसेच घरांच्या मजबुतीकरण करण्याचे निर्देश आधीच दिलेले आहेत. या धक्क्यानंतर अनेक नागरिकांनी घराबाहेर बऱ्याच काळ थांबणे पसंत केले. या भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती अजूनही पुढे आली नाही.