Eventually, MNS and BJP formed an alliance in Palghar

नाय नाय म्हणता अखेर मनसे भाजप युती झाली आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या युतीची जोरदार चर्चा आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युतीची चर्चा फेटाळण्यात आली होती. मात्र, अखेर पालघरमध्ये मनसे आणि भाजपची युती झाली आहे(MNS and BJP formed an alliance in Palghar ).

    पालघर : नाय नाय म्हणता अखेर मनसे भाजप युती झाली आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या युतीची जोरदार चर्चा आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युतीची चर्चा फेटाळण्यात आली होती. मात्र, अखेर पालघरमध्ये मनसे आणि भाजपची युती झाली आहे(MNS and BJP formed an alliance in Palghar ).

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महिन्याभरापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आज पुण्यातही (Pune) मनसे नेत्यांनी भाजपसोबत युतीची जाहीर मागणी केली होती. मनसे आणि भाजपची पहिली युती अखेर पालघरमध्ये (Palghar) झाली आहे.

    पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मनसे युती झाल्याचे समजते. पालघर जिल्हापरिषदेत 57 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18, राष्ट्रवादी 17, भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष मिळून बहुमताचा आकडा पार करत महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील 15 सदस्य, तर पालघर, डहाणू, वाडा आणि वसई या चार पंचायत समिती मधील 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं होतं.