burnt home

लहू भोये(lahu bhoye) हे शेतावरच छोटीशी झोपडी(home burnt in dahanu area) करून राहात होते.दिवसभर गावात फिरून मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. रविवारी काही कामानिमित्त सहकुटुंब गावाबाहेर गेले होते. सोमवारी दुपारी २ वाजताच्या च्या सुमारास त्यांच्या झोपडीला आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    जितेंद्र पाटील, डहाणू: विवळवेढे येथील लहू भोये या शेतमजुरी करण्याऱ्या माणसाचे घर जळून खाक(house burnt) झाले आहे. लहू भोये हे शेतावरच छोटीशी झोपडी करून राहात होते.दिवसभर गावात फिरून मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. रविवारी काही कामानिमित्त सहकुटुंब गावाबाहेर गेले होते. सोमवारी दुपारी २ वाजताच्या च्या सुमारास त्यांच्या झोपडीला आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग कशाने लागली त्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. भोये यांचे घर मुख्या वस्ती पासून दूर असल्यामुळे याठिकाणी नागरिकांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे भोये यांचे घर पूर्ण पणे जळून खाक झाले.

    लहू भोये हे गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. त्यातून त्यांना महिन्याला १५०० ते २००० रुपये पगार मिळतो.त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह होतो.त्यांच्या घरात ते त्यांची पत्नी दोन मुली आणि दोन मुलं आहेत. त्या सर्वांचे पोट भरण्यासाठी लहू भोये साफसफाई करून झाल्यावर उर्वरित वेळेत गावात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भारतात. गावातील सर्वच लोकांच्या कामासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या लहू भोये यांचे घर जळल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    fired home

    जळालेल्या घराचा ग्रामपंचायतीमार्फत पंचनामा करण्यात आला आहे. मात्र शासकीय मदत मिळण्यासाठी वेळ लागेल तोपर्यंत बेघर कुटुंबाला काहीतरी मदत करावी या हेतूने गावातील तरुणांनी त्यांना घर बांधण्यासाठी सिमेंट पोल आणि सिमेंट पत्रे घेऊन देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी आपआपल्या परीने मदत देण्याचे आवाहन गावातील तरुणांकडून करण्यात येत आहे.या निराधार कुटुंबाला मदतीसाठी तरुणाई कडून चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. सर्वांच्या कामात येणाऱ्या लहू भोये यांचे घर लवकरच पुन्हा उभे करण्यासाठी विवळवेढेकर सज्ज झाले आहेत.