अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात भातपिकाचे अतोनात नुकसान, शेतकऱ्यांकडून होतेय पीक विम्याच्या रकमेची मागणी

पालघर (Palghar) जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Rice Crops Loss) झाले आहे. पिकांची नुकसानीची पाहणी करुन संरक्षित पीक विमा(Crop Insurance) देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी अनिल पाटील करीत आहेत.

    पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान(Farmers Loss Due To Rain) झाले. यात वाडा(Wada) तालुक्यातील शेतकरीवर्गाचेही नुकसान झाले.वाडा तालुक्यातील कलमखांड येथील अनिल पाटील या शेतकऱ्याचे भातपिकाचेही नुकसान झाले. त्यांनी साठवणूक केलेल्या भाताच्या पेंढीला पावसामुळे कोंब आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी यावर्षी १४ एकरची लागवड केली. मात्र या अवकाळी पावसाने त्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेतकरी वर्गाचे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांची नुकसानीची पाहणी करुन संरक्षित पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी अनिल पाटील करीत आहेत.

    यावर्षी पावसाने खरिपाबरोबर रब्बी पिकाचे नुकसान केले आहे. वाडा तालुक्यात रब्बी पिक उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहेत. मात्र मजूर खर्चही परवडेनासा झाला आहे. सरकारने मदत करावी.

    - अनिल पाटील, प्रसिद्ध शेतकरी कलमखांड, वाडा, पालघर

    वाडा तालुक्यातील कलमखांड येथील अनिल पाटील यांनी या वर्षी खरीप क्षेत्रा बरोबर रब्बी पिकांची लागवड केली होती रब्बी पिकात त्यांनी हरभरा,कोथिंबीर,उदीड,मुग,राई यापिकांची लागवड केली. त्यांनी प्रती हेक्टरी एकूण ५० हजार रुपये खर्च केले. कंचाड शेतकरी सेवा सहकारी सोसायटीकडे पीक विम्याची रक्कम न भरता त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडून पीक विमा कंपनीला सादर केली. पावसाने नुकसान केल्याने त्यांच्या कुटुंबियांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

    त्याचप्रमाणे अवकाळी पावसाने केलेल्या भात पिकाच्या ८ एकर नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी प्रतिक्रिया कलमखांड येथील महिला शेतकरी सरस्वती गजानन पाटील यांनी दिली.