farmers protest at javhar

वन विभागाने(forest department) मापून दिलेले वन प्लॉट जमिनीतील झाडांच्या फांद्या, व पालापाचोळा तोडू नये यासाठी वन विभागाने अनेक शेतकऱ्यांवर(farmers) गुन्हे दाखल(crime) करून कारवाई केली आहे.

जव्हार: वन विभागाने(forest department) मापून दिलेले वन प्लॉट जमिनीतील झाडांच्या फांद्या, व पालापाचोळा तोडू नये यासाठी वन विभागाने अनेक शेतकऱ्यांवर(farmers) गुन्हे दाखल(crime) करून कारवाई केली आहे. झाडांच्या फांद्या व पालापाचोळा तोडण्यास वन विभागाने बंदी घातली आहे. ही घातलेली बंदी उठवून वन प्लॉट धारकांना झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, तसेच रोजगार हमीची कामे अधिकाधिक सुरू करावीत या मागणीसाठी कॉ. रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर आज जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा(farmers protest) काढला.

वन विभागाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांनी बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात केली. यशवंतनगर मोर्चा, पाचबत्ती नाका, गांधीचौक, मांगेलवाडा आणि जव्हारचे प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत वन विभाग शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत धडक मोर्चा काढून शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शविला आहे.

वन हक्क कायद्यामध्ये आदिवासी बांधव कसत असलेली वन प्लॉट पट्ट्याचे वाढीव क्षेत्र देण्यात यावे, जंगलातील वन विभागाने मापणी करून दिलेल्या जमिनीतील झाडांच्या पालापाचोळा किंवा फांदी सोडण्यास परवानगी देण्यात यावी, तसेच वन प्लॉट क्षेत्रातील झाडांच्या फांद्या व पालापाचोळा  जमा केल्याशिवाय येथील शेती होऊ शकत नाही आणि त्यामुळे बेरोजगारी वाढून उपासमारी होऊ शकते म्हणून वन विभाग आणि लागलेले नियम अटी शितील कराव्या तसेच रोजगार हमीचे कामे सुरू करावीत यासाठी जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना समज देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या धडक मोर्चाचे नियोजन माकपाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. रतन बुधर, माजी पं.स. सदस्य कॉ. यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव, कॉ. यशवंत बुधर, कॉ. शिवराम बुधर, कॉ. विजय शिंदे, सुरेश बुधर, कॉ. शांतीबाई खुरकुटे, आदी मान्यवरांच्या नेतृवाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.