प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ट्रेलरमधून(Theft From Trailer  सळया चोरून विकणार्‍या टोळीच्या वालीव पोलीसांनी(Waliv Police) मुसक्या आवळल्या असून,त्यांच्याकडून २ कोटी १३ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

    वसई: लांब पल्ल्यावर जाणार्‍या ट्रेलरमधून(Theft From Trailer  सळया चोरून विकणार्‍या टोळीच्या वालीव पोलीसांनी(Waliv Police) मुसक्या आवळल्या असून,त्यांच्याकडून २ कोटी १३ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

    महामार्गावरून वाहतूक करणार्‍या ट्रेलर चालकाला हाताशी धरून ट्रेलरवरील काही सळया चोरून वसईत उतरवल्या जात होत्या.या सळ्या खैरपाडा पाण्याच्या टाकीजवळ जमा करून त्यानंतर त्या विकल्या जात असल्याची माहिती वालीव पोलीसांना मिळाली होती.त्यावरून गुन्हे शाखेने सापळा रचून खैरपाड्यात धाड टाकून लोखंडी सळयांनी भरलेले सहा ट्रेलर,एक आयसर टेम्पो,एक वॅगनार कार असा एकूण २ कोटी १३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

    या प्रकरणी प्रशांत सिंग,उमेश सिंग,पृथ्वीपाल सिंग,रामु गौत्तम,संदीप गोंडा,मोहीदुर बाबरअली आणि रमेश राजभर,पंकज सिंग,कमलेश वर्मा या ९ जणांना अटक करण्यात आली आहे.