hotel board in gujrati

मुंबई अहमदाबाद महामार्गावर(mumbai ahmadabad highway) चारोटी टोल नाका ते अच्छाड या भागात अनेक हॉटेल,धाबे, आस्थापने यावर गुजराती(gujrati name plates) व इंग्रजी नाम फलक आहेत. महाराष्ट्रात असून मराठीतच(marathi) नावे असावीत असे शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

  डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावर(mumbai ahmadabad highway) अनेक हॉटेल, धाबे यांची नावे गुजराती(gujrati and english board of hotels) व इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे हा भाग गुजरातमध्ये समाविष्ट झाला की काय असे अनेक प्रवासी विचारत आहेत. या गुजराती पाट्याच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक व मनसैनिक आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

  मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाका ते अच्छाड या भागात अनेक हॉटेल,धाबे, आस्थापने यावर गुजराती व इंग्रजी नाम फलक आहेत. महाराष्ट्रात असून मराठीतच नावे असावीत असे शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यासाठी काही महिन्यांपुर्वी आंदोलन झाली होती. पण पुन्हा एकदा या भागात अनेक पाट्या गुजरातीत दिसत आहेत.

  गेल्या वर्षी गुजराती पाट्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी सर्वांनी आपल्या हॉटेल, धाब्यावर मराठी फलक लावले होते. आता पुन्हा आंदोलन करणार आहोत. ज्यांनी मराठीत आपल्या हॉटेल, धाब्याची नावे लिहली नसतील त्यांनी लवकरच नावे बदलून घ्यावी.

  - भावेश चुरी,पालघर जिल्हा मनसे उपाध्यक्ष

  काही महिन्यापूर्वी विव्हळवेढे महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी असलेल्या पाट्या गुजरातीत होत्या तेव्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या विरोधात आंदोलन करण्यात येईल असे सांगितल्याने मंदिरातील गुजराती पाट्या बरोबर मराठी पाट्या लावण्यात आल्या.

  चारोटी, तलासरी,घोलवड, अच्छाडच्या पुढे गुजरात राज्याची बॉर्डर सुरु होते, त्यामुळे अनेक गुजराती प्रवासी या भागात येत असतात. त्यामुळे अनेक हॉटेल, ढाबा चालक गुजराती भाषेत नामफलक लिहितात. पण यामुळे हा भाग गुजरात राज्यात समाविष्ट झाला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी येथील मराठी भाषिकदेखील या गुजराती पाट्यांच्या विरोधात बोलत आहेत.