नोटरी करताहेत बेकायदा व्यवहार, वकीलांचीच पोलिसांत तक्रार 

महाराष्ट्र शासनाने वसई (Vasai) तालुक्यात २०१७ ला १५ नोटरी नियुक्त केले होते.या १५ नोटरी व्यतीरिक्त नालासोपारात ८ नोटरी गेल्या कित्येक वर्षांपासून बेकायदेशीरपणे काम करीत आहेत.

वसई : नालासोपारातील (Nalasopara) नोटरी वकील बेकायदा व्यवहार करीत असल्याची तक्रार वसईतील वकीलांनीच केल्यामुळे कायद्याच्या दरबारी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शासनाने वसई (Vasai) तालुक्यात २०१७ ला १५ नोटरी नियुक्त केले होते. या १५ नोटरी व्यतीरिक्त नालासोपारात ८ नोटरी गेल्या कित्येक वर्षांपासून बेकायदेशीरपणे काम करीत आहेत.
या वकीलांना कोणताही अधिकार नसताना ते कार्यालय थाटून नोटरीचा व्यवसाय करीत आहेत.सदर नोटरी बेकायदेशीर जमीनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार,कौटुंबीक विवाह विच्छेदन असे दस्त नोंदवून जनतेची आणि शासनाची फसवणूक करीत.तसेच शासनाचा महसुलही बुडवत आहेत.जनतेची आणि शासनाची फसवणूक हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे त्यांचे रजीस्टर आणि कार्यालय जप्त करण्यात यावे.अशी मागणी वसईतील वकीलांनी तुळींज पोलीस ठाण्यात केली आहे.

आम्ही तक्रार केलेल्या व्यक्ती वकीलही नाहीत,एका नोटरीकडून अधिकार घेवून ते नोटरी करीत आहे.ते बेकायदेशीर आहे.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्य आहे.

ऍड.जोत्स्ना वर्तक,नोटरी