पालघरमध्ये डहाणू तलासरी भागात पाऊसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान

डहाणू आणि तलासरी भागातील शेतकऱ्यांची शेतातील पीक बहरून फुलून तयार झालेले होते पण मुसळधार पाऊस पडला आणि तयार झालेले धान्याच्या कणिसांमध्ये पाणी गेल्याने धान्य खराब झाले आणि भात खाली पडलेला आहे.

तलासरी (अरविंद बेंडगा) : पालघर जिल्हात डहाणू आणि तलासरी भागात सकाळी ०८:०५ विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे आणि मोठ्याने ढगांचा आवाजासहित पाऊस कोसळतोय त्यामुळे पालघर मधील डहाणू आणि तलासरी भागातील जी भात शेतातील धान्य तयार झालेले होते त्या कणिसामंध्ये पाणी गेले त्यामुळे धान्य तयार होण्याअगोदरच खराब झाले आहे.

डहाणू आणि तलासरी भागातील शेतकऱ्यांची शेतातील पीक बहरून फुलून तयार झालेले होते पण मुसळधार पाऊस पडला आणि तयार झालेले धान्याच्या कणिसांमध्ये पाणी गेल्याने धान्य खराब झाले आणि भात खाली पडलेला आहे. त्यामुळे एन तोंडावर तयार झालेले धान्य डहाणू आणि तलासरी भागात शेतकऱ्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.