पालघरमध्ये कोरोनाचा उच्छाद, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश

पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. पालघरमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाला असून बाजारपेठा आणि रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं चित्र दिसतंय. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल, तर बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करणं गरजेचं आहे. त्यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

    फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाने देशभरात पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशातील जवळपास सगळ्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून देशात कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या नंबरवर असल्याचं सिद्ध झालंय. महाराष्ट्रातील पालघरमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे.

    पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. पालघरमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाला असून बाजारपेठा आणि रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं चित्र दिसतंय. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल, तर बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करणं गरजेचं आहे. त्यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

    महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरीकरण असलेल्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद, नांदेड या शहरांसोबत आता पालघरमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. अचानक रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवरही त्याचा ताण येत असून कोरोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.

    हे सुद्धा वाचा

    सतत हात धुणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर सोबत बाळगणे आणि सोशल डिस्टन्सिंग या चतुःसुत्रीचा वापर प्रत्येक नागरिकानं करावा, असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येतंय. नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही, तर लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचं सांगण्यात येतंय.