gawit at mokhada burnt house

मोखाडा (mokhada fire)तालुक्यातील ब्राह्मण पाडा येथील अनंता  मौळे यांच्या दुकानाला व लागून असलेल्या घराला रविवारी रात्री २.३० वाजता शॉट सर्किट मुळे आग लागली. आग इतकी भयानक होती की काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले यात दुकानातील संपूर्ण माल जाळून खाक झाला.

    जव्हार: मोखाडा (mokhada fire)तालुक्यातील ब्राह्मण पाडा येथील अनंता  मौळे यांच्या दुकानाला व लागून असलेल्या घराला रविवारी रात्री २.३० वाजता शॉट सर्किट मुळे आग लागली. आग इतकी भयानक होती की काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले यात दुकानातील संपूर्ण माल जाळून खाक झाला. अनंताची चार मुले, आई व पत्नी असे सात जणांचे कुटुंब त्या घरात राहत होते. आगीत झोपलेल्या वृद्ध आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे वय १५ तर मुलगा कृष्णा मौळे वय १० या चौघांचा झोपेतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलगा भावेश मौळे वय १२ व मुलगी अश्विनी मौळे वय १७ हे दोघे भाजले असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

    पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या ब्राह्मण पाडा या ठिकाणी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि भयानक आहे.या घटनेत मौळे कुटुंबातील जखमी झालेल्या मुलांच्या शैक्षणिक खर्च शिवसेना पक्षाकडून करण्यात येईल.

    - राजेंद्र गावित, खासदार

    ही घटना एवढी भयानक होती की सगळीकडे अगदी वाऱ्यासारखी ही बातमी पसरली या घटनेची माहिती मिळताच पलघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांनी मोखाडा तालुक्यातील ब्राम्हण पाडा या गावात घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक स्वरूपात मदत केली. यावेळी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित,पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, पोलीस निरीक्षक सतीश गवई ,ईश्वर कोकाटे आदी उपस्थित होते.