nanbhat lake

तलावावरील पाण्यात चलचित्र उभारून सामाजिक संदेश देणारी अवि संघटना नानभाट तलावावर(nanbhat lake) यंदा कोरोनाचा (corona)देखावा उभारणार आहे. लोकवर्गणी आणि २०० ते ३०० कार्यकर्त्यांच्या श्रमातून दरवर्षी वसईच्या(vasai) पश्‍चिम पट्ट्यातील नानभाट तलावाच्या पाण्यावर अवि संघटना नाताळचा देखावा(Christmas decoration)  उभारत असते.

वसई:तलावावरील पाण्यात चलचित्र उभारून सामाजिक संदेश देणारी अवि संघटना नानभाट तलावावर(nanbhat lake) यंदा कोरोनाचा (corona)देखावा उभारणार आहे. लोकवर्गणी आणि २०० ते ३०० कार्यकर्त्यांच्या श्रमातून दरवर्षी वसईच्या(vasai) पश्‍चिम पट्ट्यातील नानभाट तलावाच्या पाण्यावर अवि संघटना नाताळचा देखावा(Christmas decoration)  उभारत असते.उंचच उंच उडणारे रंगीत,संगीत कारंजे,त्याच्या बाजुला पाण्यावर तरंगता नाताळ गोठा,या गोठ्यात झालेला बाळ येशुचा जन्म,गोठ्याच्या परिसरात सामाजिक बांधीलकी जपणारे तसा संदेश देणारे देखावे, म्युझीकल चलचित्र, तवावाकाठच्या झाडांवरील रोषणाई, झुलणारे स्टार्स,गारगार थंडीत अंगावर रोमांच निर्माण करणारे कारंज्याचे तुषार,देखावे पाहताना भेटणारी मित्र मंडळी,त्यांच्याकडून एकमेकांना दिल्या जाणार्‍या शुभेच्छा असे एकंदरीत वातावरण नानभाट तलावावर दरवर्षी असते.

दररोज पंचक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे हे निरनिराळे देखावे गेल्या २२ वर्षांपासून अक्करभाट-विठोरी म्हणजेच अवि संघटनेचे कार्यकर्ते साकारत आहेत.या संघटनेचे अध्यक्ष मार्शल लोपीस यांच्या संकल्पनेतून हे नाताळ गोठे तलावावर उभारण्याचे धाडस कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.त्यासाठी सुमारे एक एकर भर पसरलेल्या तलावाच्या पाण्यातून वीजवाहक तारा नेण्यात येतात.तलावावर तरंगता गोठा,ख्रिसमस स्टार्स आणि चलचित्र तयार करण्यात येते.त्यासाठी अडीज महिने २०० ते ३०० कार्यकर्ते झुंपलेले असतात.या देखाव्याला येणारा खर्च कॅथलिक बँक,जीवन विकास पतपेढी,बहुजन विकास आघाडी,महापालिका आणि अवि संघटनेकडून केला जातो.

धर्मगरु आर्च बिशप,विरारचा सुपुत्र आणि सुपरस्टार गोविंदा,पेट्रोलियम मंत्री राम नाईक,खासदार राजेंद्र गावित,आमदार पास्कल धनारे,चिंतामण वनगा,आ.हितेंद्र ठाकुर,क्षितीज ठाकुर यांच्यासह अनेक मान्यवरांनी नानभाट तलावावरील देखाव्याचा आनंद घेतला आहे.नाताळ गोठा स्पर्धेचा दरवर्षी पहिला आणि दुसरा क्रमांक नानभाट तलावाचा दावा असतो.गेल्या वर्षी माजी.आमदार विवेक पंडीत यांच्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक नानभाट देखाव्याने पटकावला होता.तत्पुर्वी कॅथलिक बँकेचा २५ हजार रुपयांचे पारितोषिकही अवि संघटनेच्या नानभाट तलावाने पटकावले होते.

हा देखावा २४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुला असतो.लाईट ॲन्ड साऊंड स्वरुपाचा हा देखावा यंदा मात्र फिक्स असणार आहे.सामाजिक अंतर ठेवून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

नाताळ साजरा करताना,सामाजिक बांधिलकीतून समाजाला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आतापर्यंत शांती,सर्वधर्म समभाव,सामाजिक एकीकरण असे संदेश देखाव्यातून देण्यात आले होते.यंदा कोरोनाबाबत जनजागृती देखाव्यामार्फत करण्यात येणार आहे .

-मार्शल लोपीस,अध्यक्ष,अवि संघटना