helth insurance in nagpur

मोफत औषध(medicine) उपचारासाठी असलेल्या आयुष्यमान भारत विमा योजनेअंतर्गत(insurance scheme) पालघर जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक लाभार्थी पात्र ठरले होते. यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे साडेतीन लाख लाभार्थींना या कार्डचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये पालघर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

संतोष चुरी, पालघर : मोफत औषध(medicine) उपचारासाठी असलेल्या आयुष्यमान भारत विमा योजनेअंतर्गत(insurance scheme) पालघर जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक लाभार्थी पात्र ठरले होते. यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे साडेतीन लाख लाभार्थींना या कार्डचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये पालघर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

या योजनेअंतर्गत १२०० हून अधिक लहान मोठ्या आजारांवर नोंदणीकृत खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये ५ लाखापर्यंत मोफत उपचाराचे प्रायोजन आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना सुलभ उपचार सहज घेता येणे शक्य झाले आहे.

सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी नोंदणीकृत असलेल्या शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये पाच लाखांपर्यंत मोफत उपचार व विमा कवच या योजनांतर्गत समाविष्ट आहे. केंद्र सरकारची आयुष्यमान भारत व राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना कार्यान्वित केली जात आहे. सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्याची यादी तयार करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थीना त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.

या योजनेअंतर्गत स्त्री रोग, हाडांचे विकार, हृदयविकार, मेंदूचे विकार, अवयव प्रत्यारोपण, मोठ्या शस्त्रक्रिया अशा एक हजार दोनशे मोठे व लहान आजार यावर मोफत उपचार केले जात आहेत. असे विकार असलेल्या रुग्णांनी नोंदणीकृत खाजगी किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणे शक्य आहे. रुग्णालयात संबंधित उपचार घेण्यासाठी गेल्यानंतर तेथील आरोग्य मित्र या योजनेसाठी मदत करणार आहेत. पालघर जिल्ह्यात विरार येथे हृदयविकारावर या योजनेंतर्गत उपचार केले जात आहेत. याच बरोबरीने पालघर जिल्ह्यात असलेल्या या लाभार्थींना पाच शासकीय तर बारा खाजगी रुग्णालयातून विमा कवच अंतर्गत उपचार घेता येणार आहेत.

आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी ही योजना व त्याचे विमा कवच प्रभावी ठरणार आहे. बाराशेहून अधिक लहान मोठे आजार यानंतर्गत समाविष्ठ असल्याने रुग्णांना जिल्हा व जिल्ह्याबाहेरच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेता येणे शक्य आहे.

- दीपिका झा,जिल्हा समन्वयक,आयुष्यमान भारत योजना

विमा कवच मिळणारी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये
ढवळे रुग्णालय, आस्था रुग्णालय, दयानंद हॉस्पिटल, संजीवनी रुग्णालय, विजयलक्ष्मी रुग्णालय,अलायन्स रुग्णालय, लाईफलाईन रुग्णालय, गोल्डन पार्क रुग्णालय, जनसेवा रुग्णालय, बदर रुग्णालय, स्टार रुग्णालय

शासकीय रुग्णालये
ग्रामीण रुग्णालय पालघर,उप जिल्हा रुग्णालय डहाणू, कासा, वाडा, पतंग शहा रुग्णालय जव्हार,

आयुष्यमान लाभार्थी
डहाणू -११९८४५
जव्हार- ४५४६३
मोखाडा- १५७७८
पालघर-५६९१५
तलासरी- ४८४४६
वाडा-३०२८८
वसई-१०३०३
विक्रमगड-३७५६७