पालघर जिल्ह्यातील मोठी बातमी, जात पडताळणी कार्यालयाच्या प्रमुखांना लाच घेताना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

पालघर (Palghar)जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Bribe For Caste Certificate)समितीचे संशोधन अधिकारी व सदस्य सचिव किशोर पंडितराव बडगुजर यांना दहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आले आहे.

    पालघर :पालघर (Palghar)जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Bribe For Caste Certificate)समितीचे संशोधन अधिकारी व सदस्य सचिव किशोर पंडितराव बडगुजर यांना दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून(Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकडण्यात आले.

    तक्रारदाराच्या मुलाने जात प्रमाणपत्र पडताळणी साठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्याच्याकडून बडगुजर यांनी दहा हजाराची लाच स्वीकारली. बडगुजर यांनी तक्रारदारास तुझ्या मुलाचे जात प्रमाणपत्र अवैध असून वैध प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करून ही रक्कम दहा हजार रुपये वर करण्यात आली. तक्रारदाराने पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दिली.

    प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. सापळा रचून बडगुजर यांना तक्रारदारकडून दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बडगुजर यांना कार्यालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, नितीन पागधरे, संजय सुतार, दीपक सुमडा, नवनाथ भगत, विलास भोये, निशिगंधा मांजरेकर, स्वाती तारवी सखाराम दोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.