Palghar Lynching Case

पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या तिहेरी हत्या प्रकरणात सीआयडीने गेल्या दोन दिवसात २४ आरोपींना अटक केली आहे.
यात ५ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

आरोपींना डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले असता, डहाणू न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एम.व्ही. जावळे यांनी, १९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच ५ अल्पवयीनांना भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

या तिहेरी हत्याकांडात न्यायालयात दाखल असलेल्या आरोपपत्रानुसार आतापर्यंत सुमारे २३८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अकरा अल्पवयीन होते. त्यातील नऊ जणांना जामिनावर सोडले तर दोघे बालसुधारगृहात आहेत. याचबरोबर आणखीन ८६ आरोपींनाही जामिनावर सोडण्यात आले आहे.

या प्रकरणात हलगर्जी पणा केल्याचा ठपका ठेवून दोन पोलीस अधिकरी यांना निलंबित केले असून कासा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.त्यानंतर या ठाण्याचा प्रभार महिला अधिकारी सिद्धबा जायभाये यांच्याकडे दिला होता.अलीकडेच त्यांची बदली झाल्याने या जागी सहायक पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.