शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना पुत्र प्रेम भोवलं, पालघरमध्ये मुलगा रोहित गावित यांचा पराभव

डहाणूतील वणई गटातून रोहित गावित सेना उमेदवार उमेदवार होते. रोहित गावित हे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र आहेत. विरोध डावलून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने रोहित गावितांच्या उमेदवारीला स्थानिकांसह शिवसैनिकांचाही विरोध होता.

    पालघर : शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहीत पालघर-वणई येथून पराभूत झाले आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपात शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपकडून आपल्याकडे घेतला होता. व राजेंद्र गावित त्या निवडणूकीत विजयी झाले. या आत्मविश्वासातून राजेंद्र गावित यांना मुलगा रोहित गावित यांच्या विजयाची खात्री होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

    वणई गटात भाजपचे पंकज कोरे यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा दारुण पराभव केला. हाती आलेल्या माहितीनुसार, पंकज कोरे हे विजयी झाले असून ४१२ मतांनी पंकज कोरे यांनी विजय पटकावला आहे. राजेंद्र गावित यांच्या मुलाला म्हणजेच रोहित गावित या वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. पण इथे जनतेनं त्यांना नाकारलं आहे. त्यामुळे याचा थेट फटका शिवसेनेला बसणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

    डहाणूतील वणई गटातून रोहित गावित सेना उमेदवार उमेदवार होते. रोहित गावित हे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र आहेत. विरोध डावलून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने रोहित गावितांच्या उमेदवारीला स्थानिकांसह शिवसैनिकांचाही विरोध होता.

    दरम्यान, शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक उमेदवाराला डावलून खासदार राजेंद्र गावित यांच्या सुपुत्राला उमेदवारी दिल्याने शिवसेनेत आणखी बंडखोरीची भीती होती.