प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पालघरमध्ये एका रिसॉर्टवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ४७ जणांना अटक केलीय. रात्री ८ नंतर जमावबंदीचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. मात्र तरीही रात्रीच्या वेळी या रिसॉर्टवर अनेक लोक एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे सर्वजण कोरोनाबाबतच्या नियम आणि निकषांचं पालन करत नसल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा मारत कारवाई केली. पालघरमधील आळेवाडी परिसरातील रिसॉर्टमध्ये ही कारवाई करण्यात आली. 

    महाराष्ट्रात कोरोनानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झालीय. अशा परिस्थितीत नागरिकांनी नियम आणि सूचनांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात. रात्री ८ नंतर मुंबई आणि महानगरांमध्ये  जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. मात्र तरीही अनेकजण या नियमांना पायदळी तुडवत असल्याचं चित्र आहे. अशांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.

    पालघरमध्ये एका रिसॉर्टवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ४७ जणांना अटक केलीय. रात्री ८ नंतर जमावबंदीचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. मात्र तरीही रात्रीच्या वेळी या रिसॉर्टवर अनेक लोक एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे सर्वजण कोरोनाबाबतच्या नियम आणि निकषांचं पालन करत नसल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा मारत कारवाई केली. पालघरमधील आळेवाडी परिसरातील रिसॉर्टमध्ये ही कारवाई करण्यात आली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर राज्यात रात्री आठनंतर जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. यानुसार एका वेळी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र बाहेर येण्यास किंवा फिरण्यास मनाई करण्यात आलीय. या आदेशाचं पहिल्यात रात्री उल्लंघन होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलीय.

    पालघरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे. पालघरमध्ये आतापर्यंत ४९,२८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून १२२१ जणांना कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालाय. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणं आणि कोरोनासंबंधी सर्व नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.