bajaj healthcare company

बजाज हेल्थकेअर(bajaj healthcare) कंपनीने(order to bajaj healthcare to stop production) प्रदूषण संदर्भातील नियमाचे उल्लंघन केल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने(pollution control board) कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

  बोईसर: राष्ट्रीय हरित लवादाने तारापुर एमआयडीसीतील १०३ कारखान्यांना प्रदूषणकारी कारखाने म्हणून १६० कोटी रुपये दंड ठोठावला होता. तरीही एमआयडीसीतील प्रदूषण काही कमी होत नाही. बजाज हेल्थकेअर कंपनीने(order to bajaj healthcare to stop production) प्रदूषण संदर्भातील नियमाचे उल्लंघन केल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने(pollution control board) कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

  तारापूर औद्योगिक वसाहतीतील बजाज हेल्थ केअर कंपनी रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता सोडून देत असल्याच्या तक्रारी नेहमीच होत राहिल्या आहेत. असे असताना कंपनी प्रशासन कुठलाही बदल न करता मनमानी कारभार करत होती.

  तारापूरच्या उपविभागीय प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार बजाज हेल्थ केअर कारखाना व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक आणि हेतु पुरस्कर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटीं शर्तींचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष काढीत विभागीय प्रदूषण नियंत्रण अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी बजाज हेल्थ केयर कारखान्याला शुक्रवारी दुपारी ७२ तासांच्या मुदतीत उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. तसेच कारखान्याचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

  बजाज हेल्थ केअर कारखान्यात बेकायदेशीररित्या ल्युमिफँट्रिन, एस्कॉर्बिल पाल्मेटेट, आर्टेमेथेर, ग्लिकाझाइड, निमुसुलाइड, अल्बेंडाझोल, सॅट्रिनिडाझोल आणि डोक्सोफिलिनचे उत्पादन घेतले जात होते.या उत्पादनांसाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेण्यात आलेली नाही.

  उच्च सीओडी असलेल्या सांडपाण्याचे विलगीकरण,संग्रहण,प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र समर्पित प्रणाली निर्माण केलेली नाही. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) साठी स्वतंत्र वीज मीटर दिलेला नाही.वाफ तयार करणाऱ्या बॉयलरमध्ये ब्रिकेट्सऐवजी कोळशाचा वापर करीत इंधन पद्धतीमध्ये बदल केल्याचे आढळून आले आहे कारखान्यातील धोकादायक घनकचऱ्याची फेब्रुवारी २०२० पासून तळोजा येथील सीएचडब्ल्यूटीएसडीएफ केंद्रात पाठवून विल्हेवाट लावली नसल्याचेही समोर आले आहे.

  बजाज हेल्थ केअर कारखान्यात बेकायदेशीररित्या ल्युमिफँट्रिन, एस्कॉर्बिल पाल्मेटेट, आर्टेमेथेर, ग्लिकाझाइड, निमुसुलाइड, अल्बेंडाझोल, सॅट्रिनिडाझोल आणि डोक्सोफिलिनचे उत्पादन घेतले जात होते.या उत्पादनांसाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे आढळून आले आहे.