protest by teacher

शिक्षक भरती झाली पाहिजे या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील (Teacher Recruitment)आदिवासी उमेदवारांनी पालघर(Palghar) जिल्हा परिषद कार्यालयासमोर मुंडन आंदोलन(Protest) सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे.

    पालघर: ‘सीओ साहेब होश मे आव’, ‘न्याय द्या न्याय द्या’ अशा घोषणा देत डी. एड. बी. एड. शिक्षक भरती झाली पाहिजे या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील (Teacher Recruitment)आदिवासी उमेदवारांनी पालघर(Palghar) जिल्हा परिषद कार्यालयासमोर मुंडन आंदोलन(Protest) सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे.

    पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती क्षेत्र विशेष शिक्षक भरती प्रस्तावाला शालेय शिक्षण विभाग व वित्त विभागाची मंजुरी घेऊन तात्काळ भरती प्रक्रिया करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले विद्यार्थी यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला आणि तिथे १० शिक्षकांनी मुंडन करून निषेध नोंदवला.

    आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी या उपोषणकर्त्यांकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. ‘भीक नको हक्क हवा’, ‘सिओ साहेब होश मे आव होश मे आव’,‘कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही’, ‘या सीओ चे करायचे काय खाली डोकं वर पाय’ च्याघोषणा देऊन भर उन्हात शिक्षकांनी आपला निषेध नोंदवत आंदोलन केले.