puranpoli

यंदा पुरणपोळया(puranpoli) महागल्या आहे. गेल्या वर्षी १० ते १५ रुपयांना मिळणारी पोळी यंदा १८ ते २० रुपयांपर्यंत गेली  आहे. पुर्वी होळीच्या (holi)सणालाच ग्रामीण भागात खेडया पाडयात प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी बनविली जात होती. मात्र आता बाजारात विविध दुकानांत व बचत गटांच्या माध्यमातुन पुरणपोळ्या रोजच मिळू लागल्याने व तीन दिवसांवर होळीचा सण आल्याने पुरणपोळ्यांची मागणी मात्र मागणी वाढली आहे.

   अमोल सांबरे, विक्रमगड: होळी रे होळी(holi)पुरणाची पोळी(puranpoli) असं म्हणतच होळीचा सण साजरा होतो. पुरणपोळयांशिवाय होळीच्या सणाची मजा नाही. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभुमीवर घरगुती व विविध खाद्यपदार्थाच्या दुकानात व महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘पुरणपोळ्या मिळतील’ असे फलक झळकू लागल्याचे दिसुन येत आहे.

  यंदा पुरणपोळया महागल्या आहे. गेल्या वर्षी १० ते १५ रुपयांना मिळणारी पोळी यंदा १८ ते २० रुपयांपर्यंत गेली  आहे. पुर्वी होळीच्या सणालाच ग्रामीण भागात खेडया पाडयात प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी बनविली जात होती. मात्र आता बाजारात विविध दुकानांत व बचत गटांच्या माध्यमातुन पुरणपोळ्या रोजच मिळू लागल्याने व तीन दिवसांवर होळीचा सण आल्याने पुरणपोळ्यांची मागणी मात्र मागणी वाढली आहे.

  दरम्यान महागाई असुनही काही छोटया विक्रेत्यांनी पुरणपोळयांचे दर वाढविलेले नाहीत.मात्र पुरणपोळ्यांचा आकार व वजन यावर हे दर अवलंबुन असतात.छोटया आकाराच्या पुरणपोळ्या १५ रुपयांपासुन ते २० रुपयांनी तर मोठ्या आकाराच्या पुरणपोळ्या १८ ते २२ रुपयांनी विकल्या जातात. आधी मागणी केल्यास पुरणपोळया तयार करुन दिल्या जात आहेत.

  वारंवार होणारी वस्तुंची भाववाढ,इंधन दरवाढ,मजुरीची दरवाढ,डाळ,गुळाची दरवाढ यामुळे पुरणपोळयाही महागल्या आहेत. पुरणपोळी बनविण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे गुळ ६५ ते ७० रुपये किलो तर चण्याची डाळ ६० ते ६५ रुपये किलो आहे. मैदा तसेच गॅस दरवाढ यामुळे प्रत्येक वस्तुंत दुपटीने दरवाढ होत असल्याने साऱ्याचा विचार करता पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत.

  - वंदना वाडेकर, गृहिणी विक्रमगड

  शहरी भागातील अपवाद वगळता ग्रामीण भागातील अनेक गृहीणी घरीच पुरणपोळया बनवणे सोयीस्कर मानतात.तर बाहेरुन तयार पुरणपोळी घेण्याकडेही नोकरदार महिलांचा कल वाढलेला आहे. मात्र या पुरणपोळयांनाही वाढत्या महागाईचा फटका बसला आहे. गेल्या वर्षापेक्षा तयार पुरणपोळीची किंमत वाढली आहे.

  पुरणपोळया तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात. आतापर्यंत या महिला दिवसाला १५० ते २०० रुपये घेत होत्या. तो दर वाढला आहे. आता गॅसच्या किंमतीतही व लागणाऱ्या सामानात भाववाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ करण्याशिवाय आमच्यापुढे पर्यायच नाही. नाहीतर आम्ही पुरणपोळया बनविण्याकरीता केलेला खर्च व त्यापासुन मिळणारा नफा यामध्ये आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. तरी एक नग २० रुपयेप्रमाणे ऑर्डर व विक्री केली जात आहे.

  -जयश्री औसरकर , अध्यक्ष सद्गुरु बचत गट, विक्रमगड

  सध्या मिठाईच्या दुकानातुन पुरणपोळ्यांची मोठया प्रमाणावर विक्री होत असते. या पार्श्वभुमीवर विक्रमगडमध्ये घरगुती पुरणपोळी बनविणाऱ्यांची संख्याही खूप आहे. महागाईत वाढ झाली असली तरी यंदा चांगल्याप्रकारे पुरणपोळयांची विक्री होईल,असा अंदाज विक्रमगड येथील पुरणपोळी विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.