सुवर्णकारांचे धाबे दणाणले- बोईसरमध्ये सराफाच्या दुकानावर दरोडा, इतक्या कोटींचा ऐवज लंपास

बोईसर(boisar) शहरातील चित्रालय येथील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा(robbery on jewellery shop) पडला आहे. येथील श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स हे दुकान रात्रीचा फायदा घेऊन बाजूच्या गाळ्याची भिंत तोडून सोन्याचे दागदागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

बोईसर : बोईसर(boisar) शहरातील चित्रालय येथील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा(robbery on jewellery shop) पडला आहे. येथील श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स हे दुकान रात्रीचा फायदा घेऊन बाजूच्या गाळ्याची भिंत तोडून सोन्याचे दागदागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने पाटील कुटुंब पुरते हादरून गेले. चोरट्यांनी १४ किलो सोने व ६० लाखांची रक्कम असा मिळून ७ कोटी ६० लाख किमतीचा माल लुटून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना मंगळवारी रात्री २ ते ३ च्या सुमारास घडली. भर वस्तीत ही जबरी चोरी झाल्याने सुवर्णकार दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा ते सात चोरट्यांचा सहभाग दिसून येत आहे. या चोरीमुळे सुवर्णकारांचे धाबे दणाणले आहे. पाटील हे खुप जुने व्यवसायिक असून त्यांच्या गेल्या दोन पिढ्यांपासून सराफी व्यवसाय सुरू आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री दुकान बंद केले. दुकान फोडल्याचे त्यांच्या सकाळी लक्षात आले असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

ही घटना मोठी असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, डीवायएसपी विश्वास वळवी, बोईसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू करण्यात आला आहे.