death

नालासोपारा(nalasopara) पश्चिमेकडील पाटणकर पार्क येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहे.या केंद्रात लसीकरण करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू(senior citizen died) झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती.

    वसई : वसई-विरार महापालिकेच्या(vasai virar corporation) नालासोपारा पश्चिमेकडील लसीकरण केंद्रामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

    नालासोपारा(nalasopara) पश्चिमेकडील पाटणकर पार्क येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहे.या केंद्रात लसीकरण करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती.गुलमोहर सोसायटी श्री प्रस्था या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकाला दोनवेळा लस दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचीही अफवा पसरली होती. या प्रकाराची शहानिशा न करता महापालिका आणि तिच्या आरोग्य विभागाला सोशल मीडियावरून टीका करण्यात येत होती.

    सकाळी लसीकरणही सुरू करण्यात आले नव्हते. लसीकरण केंद्रात दाखल होण्यापूर्वीच तेे गृहस्थ घेरी येऊन पडले.हा प्रकार कळल्यावर आम्ही ॲम्बुलन्सद्वारे पालिकेच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असे स्पष्टीकरण डॉक्टर अश्विनी नाईकनवरे यांनी दिले आहे.