naygaov bridge

कासवगतीने गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या नायगाव पुलाचा एक भाग कोसळून(naygav bridge collapsed) पडल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिवसैनिकांनी या पुलाचे काम रोखून धरले आहे.

वसई: कासवगतीने गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या नायगाव पुलाचा एक भाग कोसळून(naygav bridge collapsed) पडल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिवसैनिकांनी या पुलाचे काम रोखून धरले आहे.

नायगाव पूर्व पश्चिम बाजूला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम २००४ सालापासून संथगतीने सुरू आहे. या पुलाचे काम सुरू असल्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संथ गतीने सुरु असलेल्या या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे.निकृष्ठ बांधकामामुळे पुलाचा एक भाग कोसळून पडल्याचे रविवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. पूल पूर्ण झाला असताना हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.पुलाचा भाग कोसळल्यानंतर पिडब्ल्यूडी प्रशासनाने लगेचच सोमवारी सकाळी पुलाच्या कामाला सुरूवात केली.

मात्र निकृष्ठ दर्जाचे काम करून नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍या प्रशासनाविरोधात दंड थोपटत शिवसेनेने सोपारा खाडीपुलाचे काम बंद पाडले.पिडब्ल्युडीने कोसळलेल्या भागाचे काम सोमवारी सकाळी पुन्हा सुरू केल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे वसई तालुका ग्रामीण प्रमुख जगन्नाथ म्हात्रे, शाखाप्रमुख किरण म्हात्रे यांनी व शिवसैनिकांनी तसेच ग्रामस्थांनी धडक देऊन पुलाचे काम बंद पाडले.

नायगावचे नागरिकरण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे भविष्यात हा पूल येथील नागरिकांना प्रवासासाठी सुवर्णमध्य ठरेल.असेेे वाटत असतानाच पुलाचा एक भाग कोसळून पडल्याने पिडब्ल्यूडी प्रशासनाच्या निकृष्ठ दर्जाच्या कामावर आता शंका उपस्थित होऊ लागली आहे.दरम्यान,खासदार राजेंद्र गावित यांनी पिडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांना बैठकीला बोलावले असून जुचंद्र येथील शिवसेना शाखेत ही बैठक संपन्न होणार आहे. तसेच या बैठकीत कामाचा निर्णय होणार असल्याचे समजते. ठेकेदाराने पुलाच्या पायलिंगचे काम योग्यरित्या न केल्यानेच पुलाचा एक भाग कोसळला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ठेकेदाराने केलेले पुलाचे काम योग्यरित्या झाले आहे की नाही ते तपासून पाहण्यासाठी शासनाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.

- जगन्नाथ म्हात्रे, वसई तालुका शिवसेना ग्रामीण प्रमुख