आता दिवसाही वसई-विरारमध्ये संचारबंदी जाहीर करा, बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याची पालिकेकडे मागणी

वसई विरार (vasai virar)क्षेत्रामध्ये दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.नागरिक शासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवत आहेत. होळीपूजन आणि धूलिवंदन या दिवसात २५०-३०० रुग्ण वाढले असून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये घट झालीआहे.ही धोक्याची घंटा असून वेळीच यावर निर्बंध घालणे काळाची गरज आहे.

    वसई : गेल्या दहा दिवसांमध्ये दीड हजारहून अधिक रुग्ण सापडल्यामुळे रात्रीप्रमाणे दिवसाही संचार बंदी करण्यात यावी अशी मागणी बहुजन विकास आघाडी पदाधिकाऱ्याने वसई विरार(vasai-virar) पालिका आयुक्तांकडे केली आहे.

    वसई विरार क्षेत्रामध्ये दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.नागरिक शासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवत आहेत. होळीपूजन आणि धूलिवंदन या दिवसात २५०-३०० रुग्ण वाढले असून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये घट झालीआहे.ही धोक्याची घंटा असून वेळीच यावर निर्बंध घालणे काळाची गरज आहे.

    जनतेमध्ये आता स्वयंशिस्त निर्माण होणे आवश्यक असून ती कठोर नियमांमुळे होऊ शकते. त्यामुळे रात्रीची संचारबंदी याक्षेत्रात दिवसाही लागू करावी,लसीकरणासाठी लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल असे प्रयत्न शासन दरबारी करावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच नागरिकांपर्यंत घरोघरी पोहोचून लसीकरण मोहीम राबविणेसाठी सक्षम यंत्रणा उभी करावी.पोलीसखाते आणि सामाजिक संस्थाच्या सहकार्याने सर्व गर्दीची आणि सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी.लसीकरण केंद्रे वाढवून त्याची माहिती जनतेपर्यंत पोच करावी.अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे नालासोपारातील कार्याध्यक्ष रमेश हटकर यांनी वसई विरार महापालिकेकडे केली आहे.