ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांसमोर उभी नवी समस्या, विद्यार्थ्यांमध्ये वाढले डोळ्यांचे आजार

कोरोना या जागतिक महामारीमुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालय ठप्प झाली. पर्यायी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे(online education) जाऊन अभ्यास करण्याची नवी पद्धती सुरू झाली. या ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम(side effects of online education) समोर येऊ लागले आहेत.

जव्हार: जव्हार तालुक्यात नैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांची जडण घडण होत असे. मात्र कोरोना या जागतिक महामारीमुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालय ठप्प झाली. पर्यायी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे(online education) जाऊन अभ्यास करण्याची नवी पद्धती सुरू झाली. या ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम(side effects of online education) समोर येऊ लागले आहेत.

या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी एक्कलकोंडे होत आहेत. ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सतत मोबाईलकडे लक्ष द्यावे लागत असल्याने त्यांना मान दुखी पाठ दुखी याबरोबरच डोळ्यांच्या आहे तक्रारी वाढल्या आहेत. जव्हार तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातील पालक विद्यार्थ्यांबाबत चिंता करीत आहेत.

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कॉम्प्युटर, पॅड, टॅबलेट ,स्मार्टफोन आदींच्या माध्यमातून मुले शिक्षणाकडे वळले आहेत.या प्रकारची आधुनिक साधने हाताळण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या पद्धतीमुळे प्राप्त झाले असले आणि या ज्ञानाचा हे विद्यार्थी वैयक्तिक जीवनातही वापर करू लागले असले तरी ५ ते ६ तास पुस्तक वाचल्यानंतर जेवढा डोळ्यावर ताण येतो तेवढाच स्थान १ तास मोबाईल पाहण्याने येतो असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचाच प्रत्यय आता येऊ लागला आहे.

मुलांच्या या नवीन शिक्षण पद्धतीमुळे दक्षता तर घेत आहोत पण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा यासाठी मोबाईलवर ऑनलाईन क्लास सुरू आहे. अभ्यासासाठी मुलांना मोबाईल दिला असता ते गेम ही खेळत आहेत.त्यामुळे मैदानी खेळ बंद झाले आहेत. माझ्या मुलाला तर चष्मा देखील लागला आहे.चिंतेचा विषय आहे पण सध्या अभ्यासाची दुसरी शिक्षण पद्धती नाही.

- विशाखा साळवे,पालक,जव्हार

तालुक्यातून बालरोग तज्ञांकडे मानदुखी ,पाठ दुखी आणि विशेष म्हणजे डोळ्याच्या विविध विकारांचे बाल रुग्ण तालुक्यात वाढले आहेत, शिवाय ४० टक्के विद्यार्थ्यांना डोळ्यांना ताण येऊन चष्मादेखील लागला आहे. डोळे दुखणे थकवा चिडचिड अशा या विद्यार्थ्यांच्या तक्रारी असल्याचे बाल रोग तज्ञ डॉक्टर रामदास मराड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नसेल तर त्याचा क्लास एक तासापेक्षा कमी वेळाचा असावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जास्त ताण होणार नाही, याचाही गंभीर स्वरूपात विचार करायला पाहिजे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम
ऑनलाइन शिक्षणामुळे मान दुखी पाठ दुखी बरोबरच डोळ्यांसंबंधीच्या तक्रारी वाढल्या आहेत. एवढेच नव्हे हे तर या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असून स्मरणशक्तीही कमी होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय या सर्व शिक्षण पद्धतीने मुले घरात राहत असल्याने एक्कलकोंडी आणि रागीट होत चालले आहेत त्याचबरोबर त्यांच्यातील चिडचिडेपणा खूप वाढत चालला आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे खूप दुष्परिणाम समोर येत आहेत. ही विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही चिंतेची बाब आहे. मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्हीपुढे जास्त वेळ ठराविक पोझिशनमध्ये बसल्याने विद्यार्थ्यांमधील इतर आजारही वाढत आहेत. याबरोबरच सार्वजनिक जीवनातूनही असे विद्यार्थी बाजूला पडायला सुरुवात झाली आहे.

- डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक ,उपजिल्हा रुग्णालय, जव्हार

जव्हार तालुक्यातील शालेय विद्यार्थी आकडेवारी -पहिली ते आठवीची मुले १०,८६७ , पहिली ते आठवी मुली- १०,८६२