
वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेली गाडी बाहेर(sinking car at vasai) काढण्यात अखेर २४ तासानंतर यश आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने स्विफ्ट कारला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं.
वसई : वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेली गाडी बाहेर(sinking car at vasai) काढण्यात अखेर २४ तासानंतर यश आले आहे. जेसीबीच्या साहाय्याने स्विफ्ट कारला(swift car rescued) बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. कळंबच्या समुद्र किनाऱ्यावरुन वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यापर्यंत गाडी भरतीच्या पाण्यात वाहत आली होती.
बुधवारी सकाळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना ही कार पाण्यात बुडालेली दिसली.त्यानंतर त्या कारच्या मालकाचा शोध घेण्यात आला. कार पूर्णपणे समुद्रात बुडालेल्या अवस्थेत होती. फक्त तिचा वरचा टप आणि काच दिसत होती. कार समुद्रातील रेतीमध्ये फसल्याने तिला बाहेर काढणे कठीण जात होते.
पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान यांनी सकाळपासून शर्थीचे प्रयत्न केले. अखेर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात यश आलं. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
वसई विरार महापालिकेनेही नवीन वर्षाच्या स्वागताची नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. समुद्रावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे. पण नियमांना बगल देत हौशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर जात असल्याचे या कारमुळे उघड झाले आहे.