पोलीस कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, संपूर्ण पोलीस दलात मोठा धक्का

तुळींज पोलीस ठाण्यात (Tulinj Police Station)  पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या (Sucide)  केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी साधारण ८च्या आसपासची असून संपूर्ण पोलीस दलाला एक मोठा धक्काच बसला आहे.

पालघर : नालासोपारा (Nalasopara) तुळींज पोलीस ठाण्यात (Tulinj Police Station)  पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या (Sucide)  केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी साधारण ८च्या आसपासची असून संपूर्ण पोलीस दलाला एक मोठा धक्काच बसला आहे. आश्चर्य म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच त्यांनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली.

पोलीस हवलदार सखाराम भोये असं या कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या ४ वर्षांपासून पालघर जिह्याच्या तुळींज पोलीस स्थानकात हवालदार म्हणून कार्यरत होते. या आत्महत्येने पोलीस गटात शोकाकूळ वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे.