marriage

पालघरवरून(palghar) वऱ्हाडी मंडळी जयपूरला(jaipur) गेली होती. त्यावेळेस पंचतारांकित हॉटेलमध्ये(five star hotel) सर्वजण वास्तव्यास होते.एकत्रित एकाच ठिकाणी सर्व जण असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कोणाकोणाला होणार या विवंचनेत ही मंडळी असली तरी ही मंडळी पालघरला आल्यावर बऱ्याच लोकांच्या संपर्कात आल्याने एक प्रकारचे भीतीचे वातावरण संपूर्ण शहरात पसरले आहे.

    पालघर : पालघर येथील विकासकाच्या मुलाच्या लग्नासाठी दोनशेहून अधिक वऱ्हाडी मंडळी चार्टड विमानाने जयपूरला गेले होते. त्यातील चौघांना कोरोना झाल्याने वऱ्हाडी मंडळी कोरोना तपासणीच्या फेऱ्यात अडकले आहेत.मात्र पालघरमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    आठ आणि नऊ तारखेला पालघरवरून ही वऱ्हाडी मंडळी जयपूरला गेली होती. त्यावेळेस पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वजण वास्तव्यास होते.एकत्रित एकाच ठिकाणी सर्व जण असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कोणाकोणाला होणार या विवंचनेत ही मंडळी असली तरी दहा तारखेला ही मंडळी पालघरला आल्यावर बऱ्याच लोकांच्या संपर्कात आल्याने एक प्रकारचे भीतीचे वातावरण संपूर्ण शहरात पसरले आहे.

    महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून ऑक्टोबर महिन्यातील चित्र मार्च महिन्यात दिसू लागल्याने प्रशासनाने सुद्धा कडक धोरण अवलंबले असून खबरदारीचा उपाय म्हणून जयपूरच्या मंडळींना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे सर्वांची तपासणी करण्याची सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

    पालघरमधून गेलेली माणसे दुसऱ्या राज्यातून परत आली आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून वराच्या पित्यास आम्ही पत्र दिले असून सर्वांनी तपासणी करणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

    - सुनील शिंदे, तहसीलदार ,पालघर

    संसर्ग झालेल्या लोकांचे संपर्कामध्ये आलेल्यांना संक्रमण झाल्याची शक्यता पाहता या सर्वांना पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालघरमध्ये आल्यावर त्यातील काही मंडळी लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांनीसुद्धा आपली चाचणी करावी का याबाबत या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

    पालघरमधील अशी सुशिक्षित लोक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात असा प्रश्न निर्माण होत आहे.