chain snaching

धूम(Dhoom style) स्टाईलने सोनसाखळी चोरी(chain theft) होण्याच्या घटना विरारमध्ये वाढत चालल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून गुन्ह्याची पद्धत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विरार पुर्वेकडील बरफ पाड्यातून अजय शहा या सराईताला ताब्यात घेतले.

    वसई: सराईत चोराकडून सोनसाखळीच्या १४ गुन्ह्यांची(14 theft5 incidents) उकल करीत विरार पोलीसांनी पावणेसहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.

    धूम स्टाईलने सोनसाखळी चोरी होण्याच्या घटना विरारमध्ये वाढत चालल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून गुन्ह्याची पद्धत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विरार पुर्वेकडील बरफ पाड्यातून अजय शहा या सराईताला ताब्यात घेतले.

    अजय शहा याने विरारमध्ये केलेल्या १४ सोनसाखळी प्रकरणाची कबुली दिली.त्याच्याकडून १५३.६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि होंडा शाईन गाडी हस्तगत करण्यात आली आहे.हा एकून ५ लाख ७४ हजार ९५० रुपये किंमतीचा ऐवज असल्याची माहिती पोलीसांनी दिली.