vikramgad farm house

कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर पर्यटक निवांत व शांत ठिकाणी येण्यासाठी पसंती देत आहेत. सोमवारपासून विक्रमगड परिसरातील फार्महाऊस मुंबईच्या पर्यटकांनी फुलू लागले आहेत.

अमोल सांबरे, विक्रमगड: दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी(new year celebration) पर्यटक(tourists in vikramgad) सज्ज झाले आहेत. कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर पर्यटक निवांत व शांत ठिकाणी येण्यासाठी पसंती देत आहेत. सोमवारपासून विक्रमगड परिसरातील फार्महाऊस मुंबईच्या पर्यटकांनी फुलू लागले आहेत.

वेळेवर येणाऱ्या पर्यटकांसाठी फार्महाऊसमध्ये जागा नसल्याचे फार्म व रिसॉल्ट मालकांनी सांगितले. ज्यांना येथे आज येता आले नाही त्यांनी अगोदरपासुनच बुकींग करुन ठेवली आहे. ३१ डिसेंबर हा गुरुवार असल्याने सेलिब्रेशन काहींनी बुधवारीच केले. पालघर जिल्हयांतील विक्रमगड,जव्हार व मोखाडा या ग्रामीण भागातील निसर्ग सौदर्यांनी नटलेली शुद्ध हवा व स्वच्छ वातावरण येथे अनुभवास मिळत असल्याने मुंबईकर येथे येणे कायम पसंत करीत असतात.

यंदा ३१ डिसेंबरला गुरुवार आल्याने सेलिब्रेशन कस करायचे असा प्रश्न सर्वांसमोर आहे. कारण गुरुवार असल्याने अनेक लोक मांसाहार करत नाहीत. त्यात मार्गशीर्ष महिना म्हणजे मांसाहार नाहीच,अशी अनेकांनीच भूमिका आहे. त्यामुळे अनेकांनी बुधवारीच नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले. मात्र बाहेरील शहरातील पर्यटक सोमवारपासून सलग तीन दिवस विक्रमगडमधील विविध ठिकाणच्या फार्महाऊस मौजमजा करण्याकरीता नवीन वर्षाचे स्वागत व सेलिब्रेशन करण्याकरीता दाखल होऊ लागले आहेत. विक्रमगड तालुक्यात अंदाजीत मिळालेल्या आकडेवारीवरुन जवळपास २० ते २५ फार्म हाऊस आहेत.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विक्रमगड येथील हिरव्यागार आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांकडे आकर्षित होतात. अवघ्या एक दिवसांवर गुरुवार आला असुन त्यानिमीत्ताने शहरासह ग्रामीण भागातील सर्वच हॉटेल, बार, रिसॉर्ट, फार्म हाऊस फुल्ल होऊ लागले आहेत. या दरम्यान शेकडो लिटर दारुसह मटन,चिकन व मच्छीही फस्त होणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता ग्रामीण पोलीसही सज्ज झाले असुन अवैध मद्यधुंद वाहनचालकांना आवर घालण्यासाठी जागोजागी आदल्या दिवसापासूनच पोलीस बंदोबस्त तैनात असेल.