वसई -विरार पालिकेचे पिछे मुड – ५ दिवसांत ५५० रुग्ण सापडल्यावर लसीकरण केंद्रालाच बनवले कोरोना केअर सेंटर

वसई -विरारमध्ये(vasai virar corona) २० मार्चपासून कोरानाचे रुग्ण(corona patients) वाढण्यास मोठया प्रमाणात सुरवात झाली.तेव्हापासून २४ मार्चपर्यंत या फक्त पाच दिवसांत ५५० रुग्ण सापडले आणि त्यापैकी ४ जण दगावल्यामुळे महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.

    वसई:  लसीकरणाचा (vaccination)सपाटा लावणार्‍या वसई विरार महापालिकेने(vasai virar corporation) कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून पिछेमुड करीत लसीकरण केंद्रांचे कोवीड सेंटरमध्ये रुपांतर केले आहे.

    वसई -विरारमध्ये २० मार्चपासून कोरानाचे रुग्ण वाढण्यास मोठया प्रमाणात सुरवात झाली.तेव्हापासून २४ मार्चपर्यंत या फक्त पाच दिवसांत ५५० रुग्ण सापडले आणि त्यापैकी ४ जण दगावल्यामुळे महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. तत्पुर्वी दररोज तालुक्यात वीस-पंचवीस रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरणाला धडाक्यात सुरवात केली होती. मात्र,शुक्रवारी ९१,शनिवारी १०९,रविवारी १०१,सोमवारी ६३ आणि मंगळवारी तब्बल १९८ रुग्ण सापडल्यामुळे वालीव येथील लसीकरण केंद्र बंद करून पालिकेला त्या ठिकाणी कोरोना सेंटर पुन्हा सुरु करावे लागले आहे.

    कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी पालिकेने सोमवार,बुधवार,शुक्रवार या दिवशी विरार पुर्वेकडील चंदनसार, रानळे तलाव,नारींगी,पश्‍चिमेकडील निदान बोळींज,नालासोपारा पुर्वेकडील मोरेगांव,धानीव,पश्‍चिमेकडील पाटणकर पार्क,वसई पुर्वेकडील वालीव,पश्‍चिमेकडील दिवाणमान,नायगांव पुर्वेकडील जुचंद्र येथील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु ठेवले आहे.

    तसेच सोमवार ते शनिवार वसई पश्‍चिमेकडील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तुळींज हॉस्पिटल,बोळींज अलगीकरण केंद्र आणि शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सहभागी असणार्‍या खाजगी हॉस्पिटलमध्येही लसीकरण सुरु असून,लवकरच कौल सिटी,कोवीड केअर सेंटर येथे लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.