प्लास्टीकच्या पिशवीत आढळला तरुणीचा मृतदेह, नालासोपारा शहरात उडाली खळबळ

नालासोपारा पुर्वेकडील(young girl`s dead body was found in plastic bag at nalasopara तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगरात प्लास्टीकच्या पिशवीत एका महिलेचे प्रेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

    वसई : प्लास्टीकच्या पिशवीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने नालासोपारात खळबळ उडाली आहे. नालासोपारा पुर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगरात प्लास्टीकच्या पिशवीत एका महिलेचे प्रेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

    दुबे कंपाऊंड मधील जय मॉ शेरावली पान टपरीसमोर त्यांना काळ्या रंगाच्या प्लास्टीक थैलीत एका २० ते २२ वयोगटातील तरुणीचे प्रेत आढळून आले.रविवारी रात्री साडेनऊ वाजता उघड झालेल्या या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली होती.सोमवारी उशीरापर्यंत या तरुणीची ओळख पटली नव्हती.

    या तरुणीचा खून गळा आवळून करण्यात आल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.