कोविड-१९ ला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांवरही सातत्याने भर देण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोकणाच्या समृध्दीत भर घालून या भागातील जनतेला समाधानी जीवन देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत राहू त्यासाठी आणखी मागणी केल्यानुसार ५० खाटांचे अतिरिक्त रूग्णालय देखील सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यानी दिले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी राज्य मंत्री दिपक केसर कर आणि स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधीकारी  आणि उपस्थित अधिका-यांनी देखील यावेळी कोरोना स्थितीत जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जात  असल्याचे सांगितले.

  वेंगुर्ला :  कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यात उपलब्ध असणा-या आरोग्य सुविधा तिपटीने वाढविण्यात आल्या होत्या. मात्र आता दुस-या लाटेनंतर त्या सुविधा देखील कमीच पडल्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे सध्याच्या आरोग्य आणिबाणीच्या काळात उपलब्ध सुविधांचा सुयोग्य वापर करतानाच कोविड-१९ ला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांवरही सातत्याने भर देण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी व्यक्त केले आहे. वेंगुर्ला येथे ५० खाटांच्या नव्या रूग्णालय इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते दूरदृश्य माध्यमातून सहभाग घेताना बोलत होते.

  रूग्णांना उत्तम आरोग्य लाभो

  मुख्यमंत्री म्हणाले की, याइमारतीचे भुमीपूजन तीन वर्षापूर्वी माझ्या हस्ते झाले होते. त्यावेळी कोविड-१९ स्थिती नव्हती मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्यात अश्या प्रकारच्या सुसज्ज रूग्णालयाची गरज आहे. ते म्हणाले की परमेश्वराला माझी हीच प्रार्थना आहे की जरी ही सुविधा निर्माण करण्यात आली तरी तिचा कमीत कमी वापर करण्याची गरज पडो आणि येथे येणा-या सर्व रूग्णांना उत्तम आरोग्य लाभून ते बरे होवून लवकर परत जावो.

  सुरक्षा उपायांची दक्षता घ्यायला हवी

  मुख्यमंत्री म्हणाले की, या रूग्णालयात सर्व त्या आरोग्य सुविधा देताना मागील काळात राज्यात ज्या दुर्घटना झाल्या त्या पाहता फायरऑडीटसह ऑक्सिजनच्या सुरक्षीततेसह सा-या गोष्टी काळजीपूर्वक तपासून घ्यायची दक्षता घ्यायला हवी आहे. सध्या सर्वाधिक अडचण रूग्णाच्या सेवेसाठी सुविधा देण्याची नाही तर प्रशिक्षीत डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याची आहे असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कोकणात आरोग्याच्या संकटासोबतच वादळांचे आणि नैसर्गिक आपत्तीचे संकट देखील येत आहे. मात्र या सा-या स्थितीला आपण सारे धिराने तोंड देत आहोत असे सांगत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

  कोकणाच्या समृध्दीत भर घालू

  ते म्हणाले की कोकणाच्या समृध्दीत भर घालून या भागातील जनतेला समाधानी जीवन देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत राहू त्यासाठी आणखी मागणी केल्यानुसार ५० खाटांचे अतिरिक्त रूग्णालय देखील सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यानी दिले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी राज्य मंत्री दिपक केसर कर आणि स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधीकारी आणि उपस्थित अधिका-यांनी देखील यावेळी कोरोना स्थितीत जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.