एकाच शाळेतील १५ विद्यार्थी पॉझिटिव्ह, महाडचे आरोग्य प्रशासन हादरले

सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटीजन चाचणी करण्यात आली, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिली. दरम्यान, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना अन्य कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आहेत, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण २३८ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यातून हा अहवाल समोर आला. शनिवारी एका पालकाने कळवले की मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तातडीने सर्व विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आणि यात १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

    रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका शाळेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या शाळेतील १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि तालुक्याचे आरोग्य प्रशासन हादरले आहे.

    रायगडमध्ये मंगळवारी, कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. जिल्ह्यात ७०२ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यातील ५२१ रुग्ण एकट्या पनवेलमधील आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. असे असतानाच, रायगडमधील महाड तालुक्यातील एका शाळेतही कोरोनाने शिरकाव केल्याने धास्ती वाढली आहे. महाडमधील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १५ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

    सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटीजन चाचणी करण्यात आली, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिली. दरम्यान, सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना अन्य कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आहेत, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण २३८ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यातून हा अहवाल समोर आला. शनिवारी एका पालकाने कळवले की मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तातडीने सर्व विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आणि यात १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

    दरम्यान, कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात कठोर निर्बंधल लावावेत की लॉकडाऊन लावावे या संदर्भात चर्चा झाली.