varandha ghat

महाड-भोर -पंढरपूर मार्गावरील(mahad bho pandharpur road) वरंधा घाटाच्या(varandha ghat repair) दुरूस्ती कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. या कामावर सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महाड: महाड-भोर -पंढरपूर मार्गावरील(mahad bho pandharpur road) वरंधा घाटाच्या(varandha ghat repair) दुरूस्ती कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. या कामावर सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या पावसाळ्यात सलग दुसऱ्या वर्षी दरड कोसळून संरक्षक भिंती वाहून गेल्याने हा घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र नंतर छोट्या वाहन चालकांची अडचण विचारात घेऊन , किरकोळ दुरुस्ती करुन छोट्या वाहनांसाठी हा घाटमार्ग खुला करण्यात आला. एस.टी बसेस आणि अन्य अवजड  वाहनांसाठी मात्र हा घाटमार्ग , पूर्ण दुरुस्ती झाल्याखेरील खुला करता येणे शक्य नसल्याने, या वाहनांसाठी तो बंदच आहे. परिणामी महाड-भोर-मार्गे पुण्याच्या दिशेने होणारी वाहतूक माणगाव- ताम्हिणी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.

या घाटमार्गाच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याने आणि छोट्या वाहनांसाठी देखील हा मार्ग धोकादायक असल्याने या घाटमार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत होती आणि ती पूर्ण होत नसल्याने संतापही व्यक्त केला जात होता.

कोरानाचा वाढला प्रदुर्भाव राष्ट्रव्यापी लॉकडाऊन यामुळे शासन यंत्रणेवर आलेल्या आर्थिक तणामुळे या घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र आता या कामासाठी सव्वातीन कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. या कामासाठी निविदा दाखल झाल्या असून, येत्या चार पाच दिवसांत या निविदा उघडण्यात येतील आणि ठेकेदार निश्चित करण्यात येईल अशी माहिती महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पराते यांनी दिली.

या सव्वातीन कोटी रुपयांमधून ३० मीटर उंची आणि ३१ मीटर रुंदीची रिटेनिंग वॉल आणि २० मीटर उंची आणि १८ मीटर रुंदीची आरसीसीस भिंत बांधण्यात येणार आहे. ठेकेदार निश्चिती करुन व त्याला वर्क ऑर्डर दिल्यानंतर ३ महिन्यात हे काम पूर्ण करावयाचे आहे.