nana patekar

किल्ले रायगड(raigad fort) आणि रायगड विकास प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या २१ गावांतील पाणी प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी शुक्रवारी पाचाड येथे एका विशेष बैठकीचे (meeting to solve water issue)आयोजन करण्यात आले आहे. नाम फाऊंडेशनचे (naam foundation)संस्थापक नाना पाटेकर(nana patekar) हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    महाड: किल्ले रायगड(raigad fort) आणि रायगड विकास प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या २१ गावांतील पाणी प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी शुक्रवारी पाचाड येथे एका विशेष बैठकीचे (meeting to solve water issue)आयोजन करण्यात आले आहे. नाम फाऊंडेशनचे (naam foundation)संस्थापक नाना पाटेकर(nana patekar) हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    शुक्रवारी सकाळी ११ वाजता पाचाड धर्म शाळेसमोर ही बैठक होणार आहे. बैठकीला रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती,जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राधिकरणाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

    रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून खा. संभाजी राजे छत्रपती या परिसरातील पाण्याची समस्या कायम स्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत शोधणे सोपे जावे यासाठी त्यांनी प्राधिकरणामार्फत या सर्व परिसराचे एरियल मॅपिंग करून घेतले आहे. त्याचप्रमाणे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील रखडलेले धरण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार देखील केला आहे.