शिरगावच्या प्राणीमित्रांनी कुर्ले धरणात ४ दिवसापासून अडकलेल्या जखमी गायीची तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर केली सुटका

संदेश जंगम या युवकाने बुधवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आपणास कुर्ले धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेल्या चिखलात एक गाय अडकून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण सहकारी मित्रांसह त्याठिकाणी पोहोचलो असे सांगून गायीला बाहेर काढण्याकरिता उपलब्ध असलेल्या लाकडी काठ्यांचा वापर करून सहा ते सात फूट चिखलात अडकून पडलेल्या गाईला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आल्याचे नमूद केले.

  • पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले तातडीने उपाय

महाड : मागील चार दिवसापासून कुर्ले धरणाच्या चिखलामध्ये अडकून जखमी अवस्थेत पडलेल्या गायींची शिरगाव गावांतील प्राणीमित्रांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तिच्यावर प्रथमोपचार केल्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांकडून या युवकांना केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल धन्यवाद देण्यात येत आहेत.

या संदर्भात या युवा प्राणिमित्रांकडे यासंदर्भात विचारणा केली असा संदेश जंगम या युवकाने बुधवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आपणास कुर्ले धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेल्या चिखलात एक गाय अडकून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण सहकारी मित्रांसह त्याठिकाणी पोहोचलो असे सांगून गायीला बाहेर काढण्याकरिता उपलब्ध असलेल्या लाकडी काठ्यांचा वापर करून सहा ते सात फूट चिखलात अडकून पडलेल्या गाईला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आल्याचे नमूद केले.

गायीला वाचवण्याची मोहीम सुरू असताना शिरगाव गावात याबाबतची माहिती समजताच आमच्या मित्रपरिवारातील काहींनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिरसाट यांना याबाबतचे वृत्त समजताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन गायीला सुखरुप बाहेर काढल्यानंतर तातडीने आवश्यक असलेले प्रथमोपचार पूर्ण केले.

दुपारी तीन ते सव्वासहा वाजेपर्यंतच्या काळात शिरगावमधील आठ ते दहा युवा सर्प-प्राणी मित्रांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला यामध्ये सर्वश्री मनोज रेशीम प्रफुल धामणकर दीपक पवार ओंकार सागवेकर निखिल सागवेकर प्रीतेश साहिल रेवाळे दर्शन चव्हाण आदींचा समावेश होता.

या संदर्भात डॉ. शिरसाठ यांच्याशी विचारणा केली असता काही दिवसांपासून अन्न पाणी सदर गायीला न मिळाल्याने अशक्तपणा आला असल्याचे स्पष्ट करून यासाठी आवश्यक असलेली औषधोपचार व इंजेक्शन्स दिल्याची माहिती दिली.

दरम्यान शिरगाव गावातील युवकांनी चार दिवसांपासून चक्रात अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका केल्याच्या वृत्त समजताच शिरगाव सह परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या युवकांचे कौतुक केले आहे.