बनावट ई पास बनवून पनवेल ते जालना प्रवास करणाऱ्यांना अटक

पनवेल : बनावट ई पास बनवून पनवेल ते जालना प्रवास करणार्‍या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ई पाससाठी कोणाही खाजगी व्यक्तिला

पनवेल : बनावट ई पास बनवून पनवेल ते जालना प्रवास करणार्‍या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रवास करण्यासाठी  दिल्या जाणाऱ्या ई पाससाठी कोणाही खाजगी व्यक्तिला पोर्टल दिले नसून नागरिकांनी शासकीय लिंकवर जाऊन अधिकृत ई पास प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पनवेल पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने  राज्यातून इतर राज्यात किवा राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ऑन लाइन ई पास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील ई पासची बनावट प्रतिकृती बनवून  मारुती  राठोड रा. करंजाडे , जावेद अहमद शेख रा. करंजाडे आणि सलीम शेख रा. खारघर या मूळ जालना जिल्ह्यातील रहिवाश्यांनी बनावट ई पासचा वापर करून पनवेल ते जालन्यापर्यंत प्रवास केला. त्याबाबत माहिती मिळाल्यावर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत माहिती घेतली असता त्यांचा ई पास बनावट असल्याचे समजले. 

पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) विजय  तायडे ,उप निरीक्षक सुनील तारमाळे, कादबाने, स.पो. उपनिरीक्षक अंबादास कांबळे , हवालदार राऊत, आयरे, मोरे, पोलीस नाईक अमरदीप वाघमारे ,सुनील गर्दनमारे आणि घुले करीत असून आरोपींना १५ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.