बाबासाहब पुरंदरेंच्या अस्थी रायगडावर ठेवण्याचा प्रयत्न: जेवणाच्या डब्यात होत्या अस्थी; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

इतिहासकार, नाटककार, साहित्यिक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने ही माहिती दिली. महाड तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे(Attempt to place the remains of Babasaheb Purandare on Raigad; Two suspects in police custody).

  रायगड : इतिहासकार, नाटककार, साहित्यिक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने ही माहिती दिली. महाड तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे(Attempt to place the remains of Babasaheb Purandare on Raigad; Two suspects in police custody).

  पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अस्थी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे.

  जेवणाच्या डब्यात होत्या अस्थी

  पुरंदरे यांच्या अस्थी किल्ले रायगडावर घेऊन दोघे जण आले होते. हे दोघेही पुण्यातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोघांनी राखसदृश्य वस्तू आणि पुस्तकाची पूजा करताना छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर दिसून आले. या दोघांना किल्ल्यावर काहींनी विरोध केला. त्यानंतर या घटनेची माहिती महाड तालुका पोलिसांना मिळाली. पोलिस किल्ले रायगडावर पोहोचले. त्यांनी संबंधित दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांनीही जेवणाच्या डब्यात अस्थी आणल्या होत्या, अशीही माहिती समजते.

  जप्त मुद्देमाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत

  पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील वस्तू आणि इतर मुद्देमाल ताब्यात घेतला. तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद महाड पोलिस ठाण्यात करण्यात आली दरम्यान, ‘रायगडाचे पावित्र्य जपा, नवीन वाद महाराष्ट्रात निर्माण करू नका’, असे आवाहन राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटद्वारे केले आहे.