
बाहेरील उघड्यावरचे खाद्यपदार्थ विशेषत: जंक फूड आणि चायनिज आरोग्याला धोकादायक असल्याचे वारंवार डॉक्टरांकाडून सांगीतले जाते.मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. उरणमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चिकन फ्राईड राईस खाल्ल्याने उलट्या होऊन मुलांच्या आतड्याला आली सूज आली आहे.
रायगड : बाहेरील उघड्यावरचे खाद्यपदार्थ विशेषत: जंक फूड आणि चायनिज आरोग्याला धोकादायक असल्याचे वारंवार डॉक्टरांकाडून सांगीतले जाते.मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. उरणमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चिकन फ्राईड राईस खाल्ल्याने उलट्या होऊन मुलांच्या आतड्याला आली सूज आली आहे.
केगांव येथे हा प्रकार घडला आहे. नथुराम पाटील यांच्या घरी काही लहान मुल पाहुणे म्हणून आले होते. बुधवारी रात्री 9 वाजता उरण शहरातील एका चायनीजच्या टपरीवरून त्यांनी चिकन फ्राइड राईस हा पदार्थ आणला होता.
चायनिज खाल्ल्यानंतर त्यांच्या घरातील सहा लहान मुलं आणि एका महिलेला उलट्यांचा त्रास सुरू झाला. तात्काळ या सर्वांना उरण मधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून एका मुलीला उलट्यांचा त्रास होत असून तिच्या आतड्याला सूज असल्याने पुढील उपचारा साठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत मोरा सागरी पोलीस ठाण्यात चायनीची टपरी चालवणारा मालक आणि कुक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बाहेरच्या खाद्य पदार्थांमध्ये वापरण्यात येणारं पाणी, मसाले, रंग यामुळे आजार वाढत आहेत एवढेच नाही तर पदार्थ स्वछ जागेत बनवले नसतील तसेच शिळे पदार्थ दिले गेले तर आरोग्य धोक्यात येत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.