Loss of four thousand hectares of rice fields in Shahapur taluka
शहापूर तालुक्यात चार हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान

निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. एकेकाळी कोकणातून(Kokan) भात निर्यात केला जाई.मात्र आता भात आयात करण्याची नामुष्की ओढवणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहे. गुलाब चक्रीवादळाचा फटका(Cyclone Gulab Effect On Farming In Raigad) रायगडसह कोकणातील शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून गळून पडला आहे. ठिकठिकाणी भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

    रायगड : कोकणाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र आजमितीस कोकणातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता उध्वस्त झालेला आहे. नैसर्गिक आपत्ती, वादळे, अतिवृष्टीने(Heavy Rain) कोकणच्या शेतकऱ्यांवर (Farmers Are in Loss) मोठे संकट ओढवले आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. एकेकाळी कोकणातून (Rice Export from Kokan)भात निर्यात केला जाई.मात्र आता भात आयात करण्याची नामुष्की ओढवणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहे. गुलाब चक्रीवादळाचा फटका रायगडसह(Cyclone Gulab Effect In Raigad) कोकणातील(Kokan Farmers) शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून गळून पडला आहे. ठिकठिकाणी भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

    सुधागडातील शेतकऱ्यांच्या भातपिकांची नासाडी झाली असून प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याचाही मायबाप सरकारने विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळ, फयान वादळ, अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झाला, सलग दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे. भात पीक, घर, शेती, बागा यांचे प्रचंड नुकसान झाले. या  संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भातशेतीचा पुन्हा घात केला. आठवडाभर झालेल्या पावसाने पीक मातीमोल झाले. पेरणी व कापणीचा खर्च ही निघणार नाही अशी अत्यंत बिकट अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. जगावे की मरावे या द्विधामनःस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला शासन मदतीची अपेक्षा आहे.  या संकटाच्या काळात जिल्ह्यातील बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.