rape

माणगाव(mangav) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे येरद, पो. शिरवली गावाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याची घटना(father raped hie daughter for 3 months) घडली आहे.

    माणगाव:रायगडमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. माणगाव(mangav) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे येरद, पो. शिरवली गावाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याची घटना(father raped hie daughter for 3 months) घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादीच्या राहत्या घरी ४ ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१८ असे तीन महिने ही बलात्काराची घटना घडली आहे.

    या घटनेतील आरोपीचे नाव मनोहर कदम आहे. आपल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी तिच्या बालमनाला लाज वाटेल असे घृणास्पद कृत्य करण्यात आले. तिच्या इच्छेविरुध्द जबरी संभोग करुन या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही मनोहर कदम यांनी आपल्या मुलीला दिली. तिला मारहाणही केली.

    या घटनेची फिर्याद माणगाव पोलीसांकडे करण्यात आली असुन भा. द. वि. सं. कलम ३७६ (२) (एफ) (एन), ३२३, ४२७, ५०४, ५०६ सह पोक्सो कलम ३ (अ) ४, ५(एल) (एन), ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. माणगाव पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरिक्षक प्रियंका बुरंगले यांनी या गुन्ह्याचा तपास केला . आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

    या खटल्याची सुनावणी माणगावमधील विशेष न्यायालयात पार पडली. न्यायालयासमोर पीडित मुलीची व वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील योगेश तेंडुलकर अतिरिक्त शासकीय अभियोक्ता यांनी सरकार पक्षाच्या वतिने साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तीवाद करुन उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले.

    अभियोग पक्षाने कोर्टासमोर केलेल्या प्रभावी युक्तीवादावरून व साक्षीपुराव्यावरुन  विशेष न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी  आरोपी मनोहर कदम याला दोषी ठरवले. तसेच २४ मार्च २०२१ रोजी भा. द. वि. सं. कलम ३७६ (एन) पोक्सो कलम ५(एल) (एन), ४, ६ अन्वये जन्मठेप व रुपये १ लाख दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजूरी, भा. द. वि. क. ५०६ अन्वये एक वर्ष व रुपये १० हजार दंड न भरल्यास १ महिना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.