jasai girder collapsed

उरण -पनवेल मार्गावर जासई(Jasai) येथे (Uran-Panvel road) पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा (girder collapses) कोसळला आहे.

    पनवेल : सगळीकडे आनंदात दिवाळी साजरी होत असताना सणाला गालबोट लागले आहे.  उरण -पनवेल मार्गावर जासई येथे (Uran-Panvel road) पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा (girder collapses) कोसळला आहे.ब्रिजचे काम सुरू असताना कॉलमचा स्लॅब पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ब्रिजच्या पिलरवर व्ही कॅप बांधण्यासाठी बसवण्यात आलेला लोखंडी गर्डर अचानक कोसळल्याने जासई येथे भीषण अपघात घडला आहे. संपूर्ण स्लॅब सहित पडलेल्या या भीषण दुर्घटनेवेळी १३ कामगार काम करत होते.यापैकी एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्वरित १२ कामगार जखमी झाले आहेत.

    जखमी कामगारांना इंदिरा गांधी रुग्णालय उरण, जासई रुग्णालय उरण व काही जखमींना नवी मुंबई रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संपूर्ण वाहतूक पोलीस व पोलीस यंत्रणा घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन काही वेळातच वाहतूक सुरू करण्यात आली. जेएनपीटीचा हे काम असून जे कुमार व अजून एका सब कॉन्ट्रॅक्टरला या ब्रिजचे काम दिले होते. १ किलोमीटरचा हा पूल असून मागील २ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे.

    घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. क्रेनच्या मदतीने कोसळलेला लोखंडी सांगाडा बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे.