माथेरान इथे ‘त्या’ शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली, चारीत्र्याच्या सशंयावरुन पतीनेच केली हत्या

शनिवारी ११ डिसेबंर रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य करीत रुबिना बेन आणि अमजद खान, असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं नमुद केल होत. रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडं असल्यान साफ सफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला खोलीतील दिवाणाखाली महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला. त्यावेळी या मृतदेहाचं डोकं कापण्यात आल्याचं आढळून आलं. यामुळे, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवित महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं. तपासा दरम्यान, घटनास्थळा पासून काही फुटांच्या अंतरावर झुडपामध्ये एक बॅग आढळून आली. त्यामध्ये दवाखान्याच्या एका चिठ्ठीवर मुंबईतील गोरेगाव येथील पत्ता आढळून आला होता.

    रायगड : जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानमध्ये एका खोलीत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. परंतु, आता या महिलेची ओळख पटली असून मुंबईतील गोरेगाव येथील पुनम पाल असं या मृत महिलेचं नाव आहे. तर हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    शनिवारी ११ डिसेबंर रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य करीत रुबिना बेन आणि अमजद खान, असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं नमुद केल होत. रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडं असल्यान साफ सफाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला खोलीतील दिवाणाखाली महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.

    या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला. त्यावेळी या मृतदेहाचं डोकं कापण्यात आल्याचं आढळून आलं. यामुळे, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवित महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं. तपासा दरम्यान, घटनास्थळा पासून काही फुटांच्या अंतरावर झुडपामध्ये एक बॅग आढळून आली. त्यामध्ये दवाखान्याच्या एका चिठ्ठीवर मुंबईतील गोरेगाव येथील पत्ता आढळून आला होता.

    माथेरान येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा फोटोही मिळवण्यात पोलीसांना यश आले. यावरून, पोलीसांनी मुंबईतील गोरेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली असता पुनम पाल ही महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपास केला असता पुनम पाल ही तरुणी नवऱ्याला भेटण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने तपास केला असता माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या तरुणीसोबत असलेला तरुण हा तिचा नवरा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यावरून, पुनम पाल हिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आलं.

    सात महिन्यांपूर्वी मे 2021 मध्ये लग्न झालेल्या पुनम पाल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करण्यात आली असल्याची शक्यता पोलिसी सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. आरोपी पतीकडून पत्नीच्या मृतदेहाचे कापलेले शीर मिळवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न रायगड पोलीस करत आहेत.

    पूनम पाल हिच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली होती. मृत महीलेचा भाऊ रमेश पाल याने माध्यमांना माहीती देताना सांगितले की, पुनम पाल हिच्या पतीच्या घरच्यांनी लग्नात साडे पाच लाख हुडां घेऊन सुद्धा आणखी पैशाची मागणी सासरकडुन चालली होती. तसेच जिजाजी, सासु, सारसे व नणंद हे या आगोदर दोन वेळा माथेरान मध्ये येऊन गेलेत व सर्वांनी पुर्व तयारी करुनच आपल्या बहीणीचा खुन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.