खोपोलीतल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची भाजपाची मागणी

खोपोली: नगरपालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था असल्याने ते खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्यात यावे, या मागणीचे निवेदन खोपोली भाजपा अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली

खोपोली: नगरपालिका हद्दीतील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था असल्याने ते खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्यात यावे, या मागणीचे निवेदन खोपोली भाजपा अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी गणेश शेटे यांना दिले. यावेळी नगराध्यक्षांचे प्रतिनिधी नगरसेवक मोहन औसरमल उपस्थित होते. 

खोपोली शहरातील सर्वच प्रभागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे  दयनीय अवस्था आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.  अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत. कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत असले तरी या प्रश्नाकडेही प्रशासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. तातडीने पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी भाजपाने निवेदनात केली आहे. शहर अध्यक्ष खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस हेमंत नांदे, शहर चिटणीस ईश्वर शिंपी, माजी शहर अध्यक्ष दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, युवा नेते सचिन मोरे इ.नी निवेदन दिले. पावसाळा तोंडावर आल्यामुळे  आता डांबरीकरण शक्य नाही पण खड्डे पावसाळ्यापूर्वी भरले जातील असे आश्वासन देण्यात आले.