Indian lifeguard

अलिबागमधील(alibag) समुद्रामध्ये बुडणार्‍या पर्यटकाला(tourist) वाचविण्यात जीवरक्षकांना(lifeguard saved life) यश आले. प्रवीण क्षीरसागर असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे.

अलिबाग : अलिबागमधील(alibag) समुद्रामध्ये बुडणार्‍या पर्यटकाला(tourist) वाचविण्यात जीवरक्षकांना(lifeguard saved life) यश आले. प्रवीण क्षीरसागर असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. आज सकाळी साडेनऊ-दहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रात भरती आली. प्रवीण पोहण्यासाठी पाण्यात उतरला. यावेळी त्याचे इतर मित्र किनार्‍यावर होते.

अचानक प्रवीण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षक आणि मित्रांनी त्याला तातडीने बाहेर काढले. त्याच्या पोटातून पाणी बाहेर काढून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन तरुणाचे प्राण वाचविले आहे. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रविण हा तरबेज पोहणारा असल्याचे त्याच्या मित्रांकडून समजले.