Malnutrition in children, including pregnant women; Shocking type of Anganwadi in Shrivardhan revealed

ग्रामीण भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे येथील गर्भवतींसह मुलांना पोषक आहार मिळावा, यासाठी राज्य सरकारने मोफत पोषण आहार वाटपाची योजना आखली आहे. परंतु, या पोषक आहाराच्या नावाखाली निकृष्ट आहारच गर्भवतींसह मुलांच्या माथी मारला जात असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीवर्धन तालुक्यात दिसून आला आहे(Malnutrition in children, including pregnant women; Shocking type of Anganwadi in Shrivardhan revealed).

  अलिबाग : ग्रामीण भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे येथील गर्भवतींसह मुलांना पोषक आहार मिळावा, यासाठी राज्य सरकारने मोफत पोषण आहार वाटपाची योजना आखली आहे. परंतु, या पोषक आहाराच्या नावाखाली निकृष्ट आहारच गर्भवतींसह मुलांच्या माथी मारला जात असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीवर्धन तालुक्यात दिसून आला आहे(Malnutrition in children, including pregnant women; Shocking type of Anganwadi in Shrivardhan revealed).

  येथील स्थानिक महिलांनी याबाबत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.लहान मुलांना सदृढ बनवण्यासाठी पोषक आहार दिला जातो, मात्र अंगणवाडीतून मिळणाऱ्या चना डाळ व इतर खाद्यपदार्थ बुरशीसदृश्य आहेत, असा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. पोषक आहार पुरवण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.

  पोषक आहारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी गटशिक्षण अधिकारी उद्ध्व होळकर यांच्याकडे आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाचे पोषण आहाराचे वापट करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात सत्यमेव संघटनेने आक्षेप नोंदवला असून सरपंच, पंचायत समितीकडे तक्रार केली आहे.

  महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने गरोदर माता व लहान मुलांना आंगणवाडीच्या वतीने दर महिन्याला पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. परंतु श्रीवर्धन तालुक्यात अंतर्गत असणाऱ्या आंगणवाड्यातंून देण्यात येणार पोषण आहार सहा – सहा महिने उशिराने येतो आणि तेही भेसळयुक्त असल्याची लाभार्थींची तक्रार आहे. याबाबत सत्यमेव संघटनेने रायगड मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

  खासगी कंत्राटदाराला पोषण आहाराचे कंत्राट दिले आहे, तेव्हापासून भांेगळ कारभार सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी.

  - सुनील शिरीषकर, राज्य महासचिव, सत्यमेव संघटना