महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार-‘ही’ धमकी देत त्या नराधमाकडून वारंवार अत्याचार

महाड(mahad) शहरातील दस्तुरी नाका येथे राहणाऱ्या काचले गावचे रहिवाशी असलेल्या ४७ वर्षीय इसमाने पीडित महिलेला स्प्राईट या शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन ती नशेत असताना तिच्यावर अत्याचार(rape case in mahad) केला.

महाड : महाड(mahad) शहरातील दस्तुरी नाका येथे राहणाऱ्या काचले गावचे रहिवाशी असलेल्या ४७ वर्षीय इसमाने पीडित महिलेला स्प्राईट या शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन ती नशेत असताना तिच्यावर अत्याचार(rape case in mahad) केला. त्यानंतर त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली. तसेच या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवत शारीरिक संबंध करते वेळीची व्हिडीओ क्लिप व्हायरल(threatened by video clip)  करण्याची धमकी देऊन तिची फसवणूक केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत महाड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काचले गावातील धोंडू निवाते यांनी महाड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय पीडित महिलेला स्प्राईट शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ही महिला नशेत असताना तिच्याशी शारिरीक संबंध ठेवून त्याची व्हीडीओ क्लिप केली. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून काचले येथील आरोपी च्या जागेतील झोपडी व त्यांचे पनवेल येथील फ्लॅटवर जानेवारी अथवा फेब्रुवारी २०१९ पासून २४ डिसेंबर २०२० या कालावधीत वारंवार शारिरीक संबंध ठेवून त्याची व्हीडिओ क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवार बलात्कार करीत पीडित महिलेची फसवणूक केली.

या प्रकरणी पीडित महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी धोंडू  निवाते यांच्या विरुध्द गुन्हा रजि नं ११७ भादंवि ३७६ (२ ), ( एन ) ,३२८ ,५०६ नुसार दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल हे करीत आहेत.