Matheran, Fort Raigad also open to tourists; 2462 tourists in two days

मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली. त्यानंतर येथील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. त्यात किल्ले रायगड व माथेरानही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आली. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा तीन महिन्यांत घट्ट झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनाने जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ९.७७ एवढा झाला आहे. मात्र अद्यापही तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने रायगड जिल्हा हा चौथ्या टप्प्यात ठेवण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान आणि किल्ले रायगड काही अटीशर्थीवर खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  मुंबई : राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार आता सोमवारपासून किल्ले रायगड पर्यटकांसाठी खुले होणार असून त्यामुळे मुंबई, पुण्यातील पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. त्याचप्रमाणे माथेरानही तीन महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकर पर्यटकांसाठी हा दुहेरी आनंद असणार आहे. दोन दिवसांत सुमारे २४६२ पर्यटकांची नोंद माथेरानमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे.

  मार्च २०२१ पासून रायगड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली. त्यानंतर येथील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. त्यात किल्ले रायगड व माथेरानही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आली. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा तीन महिन्यांत घट्ट झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनाने जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ९.७७ एवढा झाला आहे. मात्र अद्यापही तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने रायगड जिल्हा हा चौथ्या टप्प्यात ठेवण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान आणि किल्ले रायगड काही अटीशर्थीवर खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  माथेरान आणि किल्ले रायगड येथील स्थानिकांचा व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून आहे. माथेरान नगर परिषद हद्दीत लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. तर किल्ले रायगड खुले करण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जात होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने स्थानिक व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र आता ही दोन्ही ठिकाणे खुली करण्यात आल्याने येथील पर्यटन पुन्हा बहरणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आनंदित झाले आहेत.

  २४६२ पर्यटक दाखल

  माथेरानमध्ये शनिवारपासून पर्यटन सुरू होताच इथे पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. शनिवारपासून पासून रविवार दुपारी तीन वाजेपर्यंत माथेरानमध्ये २४६२ पर्यटक दाखल झाले. माथेरान हे पूर्णतः पर्यटकांवर अवलंबून असल्यामुळे येथील व्यावसायिक वर्ग समाधान व्यक्त करीत आहे. तसेच पॉईंटवरील छोटे छोटे स्टॉलधारकांना पर्यटकांच्या आगमनाने काहीसा दिलासा मिळाला आहे.

  ई पासशिवाय येण्यास बंदी

  माथेरान आणि किल्ले रायगडावर ई-पासशिवाय येण्यास बंदी आहे. पर्यटनस्थळांवर आलेल्या पर्यटकाला हॉटेलमधील अंतर्गत खेळ, स्विमिंग पुलावर जाण्यास बंदी आहे. मोकळ्या जागेत व्यायाम, सायकलिंग करण्यास परवानगी आहे. पर्यटकांनी आणि हॉटेल व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उपाहारगृहे ही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. हॉटेल अस्थापनातील कर्मचारी याची आरटीपीसीआर तपासणी करणे अनिर्वाय आहे. अन्यथा प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. येणाऱ्या पर्यटकांची थर्मल स्कॅनिंग तसेच त्यांची नोंद करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.