MP Sunil Tatkare wished a happy Diwali and appealed to take care of the corona

यावर्षी चक्रीवादळाने अनेकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तरीसुद्धा कोणीही खचून जाऊ नका आलेला सण आपल्या परीने साजरा करा. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा व संदेश सुतारवाडी येथून खासदार सुनिल तटकरे यांनी तमाम जनतेला दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्या.

सुतारवाडी : खासदार सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare ) यांनी तमाम जनतेला दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या ( wished a happy Diwali ) असून सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेऊन बाहेर पडा. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर जाताना मास्कचा वापर जरूर करा. सॅनिटायइरचा वापर सुद्धा करायला विसरू नका. अद्याप कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नाही.


त्यामुळे सर्व नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. यावर्षी चक्रीवादळाने अनेकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तरीसुद्धा कोणीही खचून जाऊ नका आलेला सण आपल्या परीने साजरा करा. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा व संदेश सुतारवाडी येथून खासदार सुनिल तटकरे यांनी तमाम जनतेला दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्या.